तुळजापूर / प्रतिनिधी-
 महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे  मंदीर आणि व्यायाम शाळा(जीम) सुरू करण्याची मागणी युवा सेनेने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन देवुन केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे  की, तुळजापूर शहर जवळपास मंदीरावर  अवलंबुन आहे गेली पाच महीने  झाले कोव्हीड 19 वाव्हरस श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांन साठी प्रवेश बंद केल्याने  तिर्थक्षेञी भाविक येत नसल्याने याचा परिणाम अर्थीक उलाढाली होऊन ती पुर्णता  टप्प झाली आहे. सध्या शहारातील अनेकांना उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उपासमार टाळण्यासाठी मंदीर भाविकांनसाठी खुले करुन शहरवासियांचे थांबलेले अर्थचक्र सुरु करुन त्यांना दिलासा द्यावा तसेच  जीम बंद असल्याने व्यायाम करणा-या युवकांची गैरसोय होत असल्याने जीम  पण सुरू करण्यात याव्या असे निवेदनाद्त म्हटले आहे हे निवेदन -प्रतिक रोचकरी (युवासेना तालुकाप्रमुख), सागर इंगळे (युवासेना शहरप्रमुख), दादा रोकडे, ऋषीकेश इंगळे, अभिषेक कदम,राहुल काळे यांनी दिले

 
Top