उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
दलित इंडियन चेंबर ऑफ कमर्स अँड इंडस्ट्रीज (DOCCI)च्या शिष्टमंडळाने   गुरुवारी १३ ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.  या  शिष्ट मंडळात डिक्की चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्की महाराष्ट्र अध्यक्ष संतोष कांबळे, पुणे विभागाचे अध्यक्ष अनिल होवाळे व मुंबई अध्यक्ष अरुण धनेश्वर यांचा समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चेत, केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राज्याच्या हिस्स्याची रक्कम (मार्जिन मनी) लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येईल. राज्य सरकार शक्य तेवढे DICCI च्या उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. अशा प्रकारची माहिती DICCIचे प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे, मराठवाडा अध्यक्ष प्रफुल्ल पंडीत आणि उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शीतलकुमार शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 
 
Top