उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलच फटकारलं आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांची फटकारल्या नंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पूत्र मल्हार पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून, पार्थ पवार यांचा उल्लेख जन्मजात फायटर असा केला आहे. आमदार पुत्राने पार्थ पवार यांची पाठराखण केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मल्हार पाटील यांनी सदर पोस्ट नातेसंबधातून केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी आज पार्थ पवार यांच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अस म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यानंतर मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबत असल्याचा सोशल मीडियाद्वारे इशारा दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
दरम्यान शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले आहे. पार्थ पवार यांच्या विषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही, त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. दरम्यान पार्थ पवार यांना जरी शरद पवार यांनी फटकारले असेल, तरी त्यांनी सीबीआय चौकशीला विरोध नसल्याचंही म्हटलं आहे.
जवळचे नातेसंबंध
पार्थ पवार यांचे वडील अजित पवार आणि मल्हार पाटील यांचे आजोबा डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे. पार्थ पवार यांच्या भूमिकेला सर्वात आधी आजोळातून सर्वप्रथम समर्थन मिळत असल्याने चर्चेला उधाण आले आहे