उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद नगरपालिकेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अॅन्टीजेन टेस्ट उपक्रमात आजवर १५०७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. पैकी 61 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.
कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरत असलेल्या विविध व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांची अॅन्टीजेन किटद्वारे कोरोना चाचणी करण्याची मागणी विविध संस्थांकडून करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील नाट्यगृहात अॅन्टीजेन किटद्वारे नागरिक, व्यापार्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अवघ्या 15 मिनिटांत संबंधित नागरिकाला कोरोना आहे की नाही, हे समोर येते. त्यामुळे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पालिकेची यंत्रणा कामाला लावून शहरातील व्यावसायिक, नागरिकांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसात एक हजार 507 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 61 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित नागरिकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
गुरूवारी दिवसभरात नाट्यगृहात करण्यात आलेल्या कोरोना चाचणी उपक्रमात 418 जणांची अॅन्टीजेन किटद्वारे चाचणी करण्यात आली. कोरोनाबाधित असलेल्या 61 नागरिकांच्या रहिवास इमारती पालिका प्रशासनाने तत्काळ सील केल्या आहेत. त्या परिसरातील नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून बाधित रूग्णाच्या संपर्कातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले.