कळंब/ प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे काल दि. ८ आँगस्ट  रोजी पाच कोरणा पॉझिटिव्ह पेशंट आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून खामसवाडी गाव हे सुरक्षीत होते, परंतु पाँझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कात खामसवाडी येथील काही जन आल्याची चर्चा गेल्या आठवढ्या पासुन सुरू होती परंतु काल दि. ९रोजी सदरील नागरिकांची तपासणी केली असता ५ कोरोना पाँझीटीव्ह व्यक्ती गावात सापडले असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सदरील गाव लोकसंखेने मोठे असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सदरील घटना समजताच जिल्ह्याचे खासदार मा. ओमप्रकाश राजे निंबाळकर व तालुक्याचे आमदार श्री कैलास घाडगे पाटील यांनी तात्काळ खामसवाडी गावाला भेट देऊन दहा हजार नागरिकांसाठी अर्सेनीक गोळ्याचे पॉकेट,सेनीटायझर व मास्क आरोग्य विभागातील आशा कार्यकर्ती यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यामधून सर्व प्रशासकीय अधिकारी,अरोग्य विभागातील कर्मचारी,ग्रामपंचायत,पंचायत समीती आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.यावेळी नागरिकांना गोळ्यांची माहीती व कोरोणाबद्दल माहीती देऊन कोरोणा ला घाबरून जाऊ नये व अवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन हि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.सदरील घटनेमुळे गावांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पॉझिटिव्ह नागरिकांच्या कुटुंबातील तसेच संपर्कात आलेल्या लोकांची   दि ९ ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्रशाला खामसवाडी या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे.सदरील तपासणी दरम्यान ६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मध्ये ५ नागरीक पाँझीटीव्ह असल्याचे अढळुण आले असुन खामसवाडी येथे एकुण १० रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी  आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी श्री. जाधव व श्री.डाँ.राहुल आडसुळ यांनी केले आहे.
सदरील तपासणी कामी गावातील आशा कार्यकर्त्या,ग्रामसेवक,सरपंच, आरोग्य कर्मचारी, पोलीस,तसेच  पत्रकार बांधव हे सोशल डिस्टेंस चे पालन करून सहकार्य करत आहेत. सदरील दहा पॉझिटिव्ह रुग्णा वरून गावात अनेक पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील अशी शंका ग्रामस्थामधुन उपस्थित करण्यात येत आहे. तर गावातील व गावाबाहेरील नागरीकांनी ये-जा करु नयेत याकरीता खामसवाडी गावातील मुख्य चौकात ग्रामपंचायत च्या वतीने कोरोना प्रतीबंधीत क्षेत्र लागु करण्यात आले आहे.

 
Top