तुळजापूर / प्रतिनिधी- 
तिर्थक्षेञ तुळजापू च्या घाटशिळेच्या पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ (ता. तुळजापूर ) येथे रविवार दि. 9 रोजी सकाळी  हिंसक बनलेल्या कुञ्याने गावात  हैदोस घालुन अनेक ग्रामस्थांना चावा घेवुन जखमी केले . यात गंभीर  असणाऱ्या सात जखमीना,पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे पाठवण्यात आलेले आहे. सदरील चावा घेणारा कुञा गावालगतच्या उसाचा शेतात पळाल्याने ग्रामस्थानमध्ये भितीचे वातावरण पसरले असुन ग्रामपंचायत ने कुञ्यास ताब्यात घेवुन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सिंदफळ मध्ये इतकी मोठी घटना घडून ही  ग्रामपंचायत चे कुणीही न फिरकल्याने ग्रामपंचायत कारभारा बाबतीत नाराजी वर्तवली जात आहे.या बाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशीकी,  सिंदफळ ता तुळजापूर येथे रविवार सकाळी अचानक एक कुञा गावात आला व हिसंक होवुन लोकांना चावा घेवू लागला हा कुञा इतका हिंसक बनला की त्याला पकडण्यासाठी ग्रामस्थांची हिम्मत झाली नाही . यातील अनेक जखमी ग्रामस्थांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले माञ ज्यांना अधिक जखमा झाल्या होत्या त्यांना उपजिल्हारुग्णालयात आणले असता त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. कुत्र्याने अचानक केलेल्या हल्यात अभिजीत साबळे,  दत्ता लोखंडे,  राजश्री व्यवहारे , कावेरा शिंदे,  शुभांगी मोटे, ज्योतीराम कांबळे, दामीनी मोटे आदींचा समावेश आहे.

 
Top