उस्मानाबाद / प्रतिनिधी-
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्व ग्रामस्तरावर होणाऱ्या ग्रामसभेत सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या अडचणींच्या संदर्भात देखील प्रश्न घेऊन ग्रामीण भागातील दिव्यांगांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग घरकुल, पाच टक्के निधी, संजय गांधी निराधार योजना, कोरोना काळात दिव्यांगांना मदत, १४ व्या वित्त आयोगामधील निधी खर्च करणे, अपंग कल्याण निधीतून शौचालयांची अर्धवट राहिलेली कामे तत्काळ पूर्ण करणे, दिव्यांग व्यक्तींना मनरेगा योजने अंतर्गत जॉब कार्ड मिळवून देणे, सुगम्य भारत योजनेमध्ये ग्रामपंच्यायत हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी सुखसोयी देणे, आदी विषय १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत घेऊन दिव्यांग व्यक्तींना न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह नारायण साळंुके, काकासाहेब कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top