तुळजापूर /प्रतिनिधी
येथील  दिपक चौकात असणाऱ्या झुंजार हनुमान भजनी मंडळ व दिपक संघ वतीने प्रतिवर्षी आयोजित श्रीकृष्ण जन्माष्ठमी  सोहळा कोरोना पार्श्वभूमीवर समाजपयोगी उपक्रम घेवुन   रक्तदान शिबीर  आयोजन करुन  साजरा करण्यात आला.श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहातील   सात दिवसात  रोज मास्क, सिनेटायझर वाटप करण्यात आले  पंगतीच्या (जेवन)माध्यातुन गल्ली मधील सर्व पंगत धारकांनी दररोज अन्न पाकीट वाटप करण्यात आले तसेच संपुर्ण दिपक संघ परीसर (गल्ली) जंतु नाशकाची फवारणी करण्यात आली,भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले तसेच वृक्षारोपणही करण्यात आले सदरील वृक्षा रोपण  व रक्तदान कार्यक्रम घेवुन साजरा करण्यात आला
गोकुळष्टमी दिनी प्रथमता वृक्षारोपन करुन रक्तदान शिबीराचे उद्दघाटन नगराध्यक्ष  सचिन  रोचकरी यांच्या हस्ते  करण्यात आले. सदरील सप्ताहासाठी संयोजक नितीन रोचकरी,संजय पैलवान,उमेश पैलवान,योगेश रोचकरी,भरत सोनवणे,आमोल सोनवणे,खंडु जाधव,लल्ला जळके,नितीन पैलवान,दिनेश बागल,नितीन धोत्रे आदींनी परीश्रम घेतले
मंगळवारी सायंकाळी  “कृष्णा च्या मुर्ती स पंचामृत अभिषेक घालुन श्री कृष्णास पाळण्यात ठेवुन अंगाई गीत गाऊन सायंकाळी १२ वाजता गुलालाची उधळण करीत पुष्प वृष्टी करीत शोसल डिस्कलेशन पाळुन मोजक्या नागरीकांच्या उपस्थित टाळ मृधगांच्या गजरात श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा  साजरा करण्यात आला. कारी येथील देवांश महेश गादेकर बालकाचा गोकुळ अष्टमी दिनी  त्याचा जन्म झाल्याने त्याच्या घरातील पाल्यानी आपल्या लाडक्या बालकाचा वाढदिवस गोकुळ अष्टमी दिनी श्री कृष्णा सारखी वेशभुषा परिधान करुन आपल्या बालकाचा वाढदिवस मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. बुधवारी दहीहंडी कार्यक्रमही साध्या पद्धतीने मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.
 
Top