उस्मानाबाद / प्रतिनिधी-
लाॅकडाऊन उठवा.... उद्योगधंदे सुरू करा, बहुजनांना जगु द्या अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादच्या वतीने आज बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. यानंतर आपल्या न्यायपुर्ण मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रशासनामार्फत पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना करण्यात आल्या तसेच सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. व ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादि ज्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी होईल अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निबंध घालण्यात आले. या चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. आज अर्थव्यवस्था संकटात आहे. 80% पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. आदीचा गांर्भीयाने विचार करून सरकारने काही निर्णय तातडीन घेतले पाहिजेत, अशी मागणी अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच केलेली आहे. कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करण्यात आली. आंदोलनात धनंजय शिंगाडे, प्रा.के.टी.गायकवाड, रमेश गंगावणे, विकास बनसोडे, अस्मिता पारवे, अंकुश लोखंडे, आर.एस. गायकवाड, सुशिलकुमार बनसोउे, अनुराधा लोखंडे, ज्योती लोखंउे, अंकोल वाघमारे, सुदर्शन बनसोडे, नितिन बनसोडे आदींने भाग घेतला.