जगात सर्वत्र कोरोनामुळे अहाकार उडाला असतानाच कांही अॅम्ब्युलन्सवाले मात्र साध्या-साध्या रूग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी लूट करीत असल्याचे समोर आले आहे. लुट करणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या विरोधात प्रशासन कांही कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित करून अॅम्ब्युलन्सचे दर निश्चित करावे व रूग्णांना दिलासा दयावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राज्यात अॅम्ब्युलन्सचे दर ठरवून दिले आहेत, असे असतानाही प्रत्येक्षात मात्र १० पटीपेक्षा जास्त रक्कम आकारून रूग्णांची लूट करीत असल्याचे दिसत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा जिल्हा प्रशासन यांनी या मनमानी कारभारवर वचक ठेवणे गरजचे बनले आहे. १७ जुलै २०२० रोजी उस्मानाबाद शहरातून सोलापूर येथील रूग्णांलयात रूग्ण घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्सवाल्यानी १५ हजार रूपये घेतल्याचे उमेशराजे निंबाळकर यंानी सांगितले. तर गुरूवार दि. ६ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद शहरातील रामनगर हॉस्पीटल मधील एका रूग्णांला सोलापूर येथे जाण्यासाठी अॅम्ब्युलन्सवाल्यांनी १० हजार रुपये घेतले. या संदर्भात रूग्णांच्या नातेवाईकांनी विचारले असता. कार्डीओ व ऑक्सीजन असल्यामुळे आमचा हाच दर असल्याचे सांगून पैसे रोख जमा करा असे सांगितले. वास्तविक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अॅम्ब्युलन्सचे ठरविलेले दर ५०० रुपयापासून ते ४ हजार रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये आयसीयू अॅम्ब्युलन्सचा ही समावेश आहे. असे असताना ही रूग्णांची लूटमार चालूच आहे. विशेष म्हणजे भाडेवसूल करणारे अॅम्ब्युलन्सचालक पावती मात्र संबंधित हॉस्पीटलमधून घ्या, असे सांगतात.
जिल्हयात 3 ॲम्बुलन्स दाखल
covid-19 च्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी माजी पालकमंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे 3 ॲम्बुलन्स देण्यात आल्या.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे उपस्थित होते.

खासदारांची प्रतिक्रया
सदर माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अॅम्ब्युलन्स दरातुन होत असलेली लुट या प्रकरणाची तीव्र नाराजी व्यक्त केली.या संदर्भात आपण लक्ष्य घालू असे सांगितले.