उस्मानाबाद / प्रतिनिधी-
नुतन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान चे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर पदभार स्विकारल्या नंतर यांचा दि.२६ बुधवार दुर्गाष्टमी दिनी श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीत प्रथमच दौरा झाला .श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरातील प्रशासकीय कार्यालयात महसुल प्रशासन पोलीस प्रशासन व न.प.प्रशासन यांच्या सोबत संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर गेल्या १७ मार्च पासून बंद आहे या बाबत श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर उघडण्या बाबत सर्व अधिकारी सोबत विशेष बैठक होऊन चर्चा करण्यात आली.
सदरील बैठकीत संसर्गजन्य कोरोनाच्या साथी च्या रोगामुळे श्री तुळजा भवानी मंदीर उघडण्या बाबतीत सर्व शोसल डिसक्सलेन्स पाळुन  संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगाचा फैलाव होऊ नये याची दक्षता घेऊन योग्य त्या उपाययोजना करुन श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर भाविकांसाठी चालु केले तर गर्दीवर कसे नियंत्रण करता येईल  या बाबत चर्चा करण्यात आली,श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जो कांही कुल धर्म कुलाचार विधिवत पुजा चालु आहेत.त्या पुर्वी प्रमाणे चालु राहतील या बाबतीत श्री तुळजाभवानी मातेच्या तिन्ही पुजारी मंडळा सोबत विचार विनियम घेऊन चर्चा करण्यात येईल. तसेच पुजारी वर्गाना  विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. संसर्गजन्य कोरोना साथी रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून सर्वांनी सहकार्य करावे,अशी विनंती करण्यात आली तत्पुर्वी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत तहसीलदार सौदागर तांदळे व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पुष्पगुच्छ व श्री देवीची प्रतिमा देवुन केला सत्कार करण्यात आला.
 या वेळी उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या तहसीलदार योगिता कोल्हे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, न.प.मुख्याधिकारी आशिष लोकरे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नगरसेवक पंडीतराव जगदाळे, विशाल रोचकरी, मंडल अधिकारी अमर गांदले,न.प.अधिक्षक वैभव पाठक, नगर अभियंता अभंग गायकवाड ,प्रशांत सावंत,इंजिनियर सुशिल सोनकांबळे, न.प.महादेव सोनार आदीसह महसुल विभाग, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे कर्मचारी व न.प.कर्मचारी उपस्थित होते.तसेच मा.नुतन जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष मा.कौस्तुभ दिवेगावकर यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन न घेताच मंदीरातील दर्शन व्यवस्थेची संपुर्ण परिसराची पहाणी केली तसेच शारदीय नवराञ महोत्सव कांही माहिन्यावर येत असल्याने येथील घाटशीळ रोडवरील कारपार्कींग येथील दर्शन व्यवस्थेची पहाणी.करुन घाटशीळ रोडवरील १०८ भवानी कोव्हीड सेंटर व १२४ कोव्हीड सेंटरला भेट देवुन पहाणी केली त्यानंतर श्री तुळजा भवानी मंदीर मार्फत चालविण्यात येणाऱ्या सैनिक शाळेस भेट देवुन पहाणी केली.
 
Top