कळंब / प्रतिनिधी
 येथील नगर परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या कोरोना प्रतिबंधक कार्यासाठी अधिग्रहित केलेल्या सेवा कोरोना संबंधित कार्यातून कार्यमुक्त कराव्यात, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तालुका शाखा कळंब यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
संबंधित शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक कार्यासाठी मागील सहा महिन्यांपासून सातत्याने कोरोना कक्ष, प्रभागनिहाय कोरोना सर्वेक्षण तसेच आदी कामासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे.परंतु ऑनलाइन शिक्षणाच्या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधक कार्यासाठी ज्या शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. त्यांना कोरोना संदर्भातील कामातून कार्यमुक्त करण्यासाठी  शासन परिपत्रकानुसार कार्यमुक्त करण्यात यावे. अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे.
 निवेदनावर तालुकाध्यक्ष नारायण बाकले, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघमारे, तालुका उपाध्यक्ष प्रदीप डांगे, तालुका सचिव मोहन सोनटक्के, पठाण वाय. डब्ल्यू., सलगरे पी. जी. वाघमारे व्ही. एस., चव्हाण ए.डी., सातपुते ए.डी., चव्हाण आर. एच., खरडकर ए. ए.आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top