उस्मानाबाद / प्रतिनिधी-
विविध मागण्यांसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य  नर्सेस फेडरेशनच्या वतीने दोन तासाचे आंदोलन आयोजन केले होते. या दोन तासाच्या आंदोलनामध्ये उस्मानाबाद जिल्हयात वाढते कोरोना रूग्ण पाहता नर्सेस असोसिएशनच्या वतीने सहभाग घेण्यात आलेला नाही.  जिल्हयात वाढत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या पाहता आंदोलन केले नसल्याचे नर्सेस असोसिएशनच्या नेत्या नलिनी दलभंजन यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्हयात शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, आयुर्वेदीक हॉस्पीटल, जिल्हा शासकीय रूग्णालय व चार उपजिल्हा रूग्णांलय यांच्यासह ७ ग्रामीण रूग्णालय आहेत. जिल्हयात एकुण नर्सची संख्या २५०० च्या जवळपास असून त्यापैकी ३५ कंत्राटी पध्दतीने कामावर घेतलेले आहेत. जिल्हयात कोरोना बांधित रूग्णांची संख्या ५ हजारच्या जवळपास झालेली आहे. वाढती रूग्ण संख्या पाहता आज महाराष्ट्र राज्य नर्सेस फेडरेशन ने केलेल्या आवाहना प्रमाणे उस्मानाबाद नर्सेस असोसिएशनच्या वतीने सहभाग नोंदविला नाही. आज महिलांचा मोठा सण असल्यामुळे अनेक नर्स महिलांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. जिल्हयात एकही वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे कोरोना रूग्णांचा भार जिल्हा शासकीय रूग्णांलयासह तालुक्यातील उपजिल्हा रूग्णांलयावर पडत आहे. रूग्णांची वाढती संख्या पाहता व अपुरे कर्मचारी वर्ग असल्यामुळे आजच्या दोन तासाच्या संपात कोणीही सहभागी झाले नाही.
स्टाफ संख्या कमी
नर्स आंदोलनासंदर्भात नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा नलिनी दलभंजन यांना विचारले असता त्यांनी कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या पाहता व नर्सेसची संख्या पाहता या आंदोलनात आम्ही भाग घेतला नाही. त्याच प्रमाणे आज महिलांचा मोठा सण असल्याने आंदोलनात सहभागी झालो नाहीत, असे सांगितले.

 
Top