उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोविडमुळे सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्याच अनुशंगाने भूम पोलिस ठाण्याअंतर्गत ५३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळांनी भूम पोलिस ठाण्यात एकाच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करून एक आदर्श उभा केला आहे.
भूम पोलिस ठाणे हद्दीतील एकुण ५३ गावे आहेत. या सर्व गावांतील सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रबोधन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, भुम ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि- मंगेश साळवे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले. यातूनच या सार्वजनिक गणेश मंडळांनी ५३ गावांचा एकच सार्वजनिक गणपती भुम पोलिस ठाण्यासमोर स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी, दि.२२ या सार्वजनिक गणपतीची स्थापना पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते ठाण्यासमोर करण्यात आली. गणेशोत्सव काळात या गणपतीच्या सकाळ- संध्याकाळ आरती, देखभालीसाठी गणेश मंडळांना जबाबदारी वाटुन देण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात या मंडळांतर्फे प्रतीदिनी जनजागृती, रक्तदान, वृक्षारोपन, गरजुंना अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर- मास्क वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.