उस्मानाबाद / प्रतिनिधी-
लोहारा पोलिस ठाण्याच्या पथकाने विद्युतपंप चोरीचा पर्दाफाश केला आहे. चार पंपचोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून आठ पंप जप्त करण्यात आले आहेत.
शेततळे, विहीरी येथील विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीतील गणेश बन्सी जाधव, सचिन वामन राठोड, अशोक धनसिंग राठोड, भाऊसाहेब रावसाहेब जाधव (सर्व रा. आनंदनगर तांडा, मौजे खेड, ता. लोहारा) यांना शनिवारी लोहारा पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून आठ विद्युतपंप जप्त केले आहेत. त्या पैकी एक पंप लोहारा येथून चोरीस गेलेला होता. तसेच उर्वरीत सात विद्युतपंपाबाबत चौघे संशयीत पोलिसांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत.