परंडा / प्रतिनिधी-
कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात श्री गणरायाची स्थापना संबंधीत गल्लीतील मंदिरात करून सकाळ व सायंकाळी केवळ पाच अथवा तीन तरुणांना नित्य आरतीस परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रातून केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, शनिवारपासून (दि.२२) सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवास महत्त्व व परंपरा आहे. आपल्या जिल्ह्यातही प्रत्येक शहर व गावात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रतिवर्षी गणेश मंडळे सार्वजनिक गणेशाची स्थापना गल्ली, गावात करतात. यावर्षी कोरोनामुळे मर्यादित स्वरूप आले आहे. जेथे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र आहे अशा ठिकाणी श्रीगणेश मंडळांची प्रतिवर्षाप्रमाणे प्रथा, परंपरा खंडित न होऊ देता शेड उभारणीऐवजी लगतच्या मंदिरात स्थापना करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यास परंपरा कायम राहिल. नियम व अटींचे पालन करुन प्रतिष्ठापनेची परवानगी द्यावी. तहसीलदार यांनी कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात गणेश स्थापना करण्यास मनाई आदेश काढले आहेत. असे केल्यास अनेक वर्षांची नित्य प्रथा, परंपरा खंडित करणारे ठरेल. गणेशाची प्रतिष्ठापना शेडऐवजी लगतच्या मंदिरात करण्यास परवानगी दिली जावी. तसेच श्री. गणेशोत्सव कालावधीत श्रींची सकाळ, संध्याकाळ नित्य आरती पूजा करण्यास मंडळाच्या केवळ पाच अथवा तीन सदस्यांना अटी, नियमांसह परवानगी द्यावी.