उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रुपामाता नॅचरल शुगर्स कारखान्याच्या दुस-‍या गळीत हंगामासाठीची पूर्वतयारी सुरु झाली आहे. शुक्रवारी (दि. 21) पोलिस उपअधीक्षक मोतीलाल राठोड यांच्या हस्ते रोलरचे पूजन झाले. रुपामाता समुहाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकटराव गुंड यांचीही उपस्थिती हेाती. कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम झाला.
या वेळी बेंबळी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, कारखान्याचे व्हाईस चेअरमन एम. के. सूर्यवंशी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भरत गुंड, अ‍ॅड. अजित गुंड, प्रशासकीय अधिकारी सूर्यकांत गरड, सचिन गुंड, विशाल सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेतकरी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपअधीक्षक श्री. राठोड यांच्या हस्ते रोलरचे विधीवत पूजन झाले. कारखाना कार्यस्थळाचीही त्यांनी पाहणी केली.या वेळी श्री. राठोड म्हणाले, की या कारखान्याचा विकास अ‍ॅड. गुंड यांची दूरदृष्टी तसेच येथील कर्मचा-‍यांची मेहनत यामुळे झाली आहे. यंदाही कोरोनासारखे संकट असताना हा कारखाना शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सुरु होत आहे.कर्मचार्‍यांनही घरातले काम सजून निष्ठेने तत्परता दाखविल्यास कारखान्यासह संस्थेचा व परिसराचाही विकास गतीने होईल.
प्रतिटन 2500 रुपये देणारा कारखाना 
अध्यक्ष अ‍ॅड. गुंड म्हणाले, की 2019-20 या वर्षातील गळित हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दहा दिवसांत प्रतिटन दोन हजार पाचशे रुपये एकरकमी देणारा रुपामाता हा एकमेव कारखाना आहे. शेतकर्‍यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्‍वास महत्वाचा आहे. कारखानाही संकटकाळात शेतकर्‍यांसेाबत हिरिरीने सोबत राहील. यंदाही याच पध्दतीने काम करण्याचे नियोजन आहे. यंदा 15 सप्टेंबरला कारखाना सुरु करण्याचे नियोजन आहे.
कोरोनाच्या धरतीवर
सॉलिड गूळ प्रकल्पाचे भूमीपूजन्र
या वेळी रोलर पूजन झाल्यानंतर ‘सॉलिड जागरी प्लँट’ या गूळ पावडर प्रकल्पाचे भूमीपूजनही उपअधीक्षक राठोड यांच्या हस्ते झाले. हा प्रकल्प उभारल्यानंत येथून 1 किलो वजनाच्या गुळाची निर्मिती केली जाणार असल्याचे अ‍ॅड. गुंड यांनी सांगितले.

 
Top