परंडा / प्रतिनिधी-
श्रीगणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर व कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनावर मात करून गुरुवारी (दि.२१) घरी परतले.
सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. आमदार ठाकूर यांचे १४ जणांचे एकत्रित कुटुंब आहे. या परिवारातील १२ जणांना बाधा झाली होती. त्यापैकी ६ जण कोरोनाची लक्षणे नसल्याने शेतात विलगीकरणात बरे झाले. तर आमदार ठाकूर यांच्या मातोश्री बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ४ दिवसांपूर्वी घरी परतल्या. आमदार ठाकूर यांच्यासह पत्नी, मुलगी, वडील व लहान भाऊ हे दि. १४ अॉगस्टपासून डाॅ. योगेश सोमाणी यांच्या मार्गदर्शनात नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी येथे उपचार घेत होते.