उमरगा / प्रतिनिधी-
तालुक्यातील पळसगाव तांडा येथे गावठी दारू तयार करण्याऱ्या दारूभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीची दारू तसेच दारू तयार करण्याचे रसायन व साहित्य जप्त केले ही कारवाई शुक्रवारी दि 7 रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान करण्यात आली या प्रकरणी चार जणांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गावठी विक्री व निर्मितीला पायबंद घालण्यासाठी मागील महिनाभरापासून पोलीस प्रशासनाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. तालुक्यातील पळसगाव तांडा येथे गावठी दारू हातभट्टी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी दि 7 रोजी पहाटे सहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक विशाखा धुळे,पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे व 20 कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचला. यावेळी गावठी निर्मितीच्या केंद्रावर छापा टाकला असता तिथे एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे तीन हजार लिटर 120 लिटर गूळ मिश्रित रसायन, 100 लिटर दारू,15 लोखंडी बरेल,4 लहान लोखंडी बॅरल, प्लास्टिकचे 2 बॅरल,15 प्लास्टिक घागरी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले मात्र एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. याप्रकरणी पोहेकॉ सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून अबू पोमा राठोड, किरण रतनू चव्हाण, मोहन रामा चव्हाण, गोपीनाथ रुपला राठोड या चार जणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान उमरगा पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री व निर्मितीवर टाच आणण्यासाठी कारवाई सुरू केल्यामुळे दारू बनविणाऱ्याचे व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.