उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील शहापूर, दहिटना , मंगरुळ , काक्रंबा , खंडाळा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गावास खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी अधिकाऱ्यानं समवेत भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला.
खासदार व आमदार यांनी गावातील लोकप्रतिनिधी, नागरिकांशी चर्चा केली. गावातील प्रत्येक कुटुंबास आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. कंटेनमेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस देण्यात आल्या. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे खासदार साहेबांनी आवाहन केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव, बाळकृष्ण पाटील, उपतालुका प्रमुख रोहित चव्हाण, जि.प सदस्य बालाजी बंडगर, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्मिता लोंढे,  शहापूर येथे सरपंच उर्मिला धोंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन काळे, माजी उपसरपंच नाना पाटील, उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरवडे, ग्रामसेवक श्री. निलागर, तलाठी श्री.जमादार, विकास सुरवसे, सचिन मोरे, बाबा जाधव, विजय काळे आदी दहिटना येथे युवासेना उपतालुका प्रमुख सुनिल कदम, सरपंच आप्पासाहेब पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष बलभीम गुड्डे, नागनाथ पाटील, उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरवडे, ग्रामसेवक सचिन राठोड, उमाकांत कदम आदी काक्रंबा येथे ग्रामपंचायत सदस्य किसन देडे, पोलीस पाटील प्रमोद खताळ, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, कालिदास सुरवसे भारत पाटील, दिपक भिसे, विकास भिसे,  लखन थोरात, संजय सोन्नटके, ग्रामसेवक अशोक वडकुते, आदी
खंडाळाचे सरपंच भिमराव दगडू लोखंडे, उपसरपंच गणेश पवार, कालिदास सुरवसे, रेशन दुकान भानदास कांबळे, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शंकर गव्हाणे, दादासाहेब लोखंडे, गोविंद सोनटक्के, नितीन ढवन, बालाजी ढवन, विशाल पवार, सोमनाथ पवार, सागर जाधव, आकाश पवार, स्वप्निल कांबळे, भरत पवार, हनुमंत चौरे, अभिजीत लोखंडे, राम पांडागळे, आशा कार्यकर्ते रशीद सय्यद, आरोग्य कर्मचारी, आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top