तेर   ( प्रतिनीधी )
  बायफ संस्‍था व नाबार्ड यांच्‍या संयुक्‍त विद्यामानातून व पशुसंवर्धन विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या मार्गदर्शनाखाली उस्‍मानाबाद जिल्‍ह्यामध्‍ये जिल्‍हाधिकरी मुधोळ मॅडम व डॉ. संजय कोलते (मुख्‍य कार्यकारी अधिकरी, जि. प. उस्‍मानाबाद) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सप्‍टेबर 2019 रोजी हा उपक्रम उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील तडवळा, मुळेवाडी, माळकरंजा, तुगाव, मस्‍सा, कडकनाथवाडी या गावातील बायफ केंद्राद्वारे राबवण्‍यास सुरवात झाली. या उपक्रमातुन करण्‍यात आलेल्‍या   कृत्रीम रेतनाद्वारे गाय वर्ग व म्‍हैस वर्गातील मादी वासरे निर्माण करण्‍याचा यशस्‍वी झाल्‍याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुनिल पसरटे यांनी दिली. 
या संदर्भात डॉ. पसरटे पुढे म्‍हणाले की, बायफ संस्‍था व पशुसंवर्धन विभाग यांच्‍या मार्फत एचएफ, जर्सी, गीर, देवणी या गायीचे व मु-हा या म्‍हशीचे पारंपारीक विर्यकांड्या वापरुन कृत्रीम रेतानाद्वारे  वासरे निर्मीतीचा उपक्रम सुरु आहे. परंतू या पारंपारीक विर्यकांड्या वापरुन होणारी वासरे निम्‍मे वासरे नर तर निम्‍मे वासरे मादी जन्‍माला येतात. म्‍हणजे 50% नर तर 50% मादी या प्रमाणात वासरे जन्‍माला येतात. परंतू 50% वासरे नर जन्‍माला आले तर त्‍यांचे करायचे काय असा प्रश्‍न  शेतक-याना पडतो. तसेच त्‍यांचे संगोपनही खुप खर्चीक होते. 
या गोष्‍टीचा विचार करुन बायफ संस्‍थेच्‍या लिंग निश्चित विर्य कांडया (Sex Sorted Semen) आपल्‍या जिल्‍ह्यातील शेतक-यासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या असून या विर्यकांड्याची किंमत सर्वसामान्‍य शेतक-यांना परवडणारी ठेवण्‍यात आली आहे. शिवाय नाबार्ड अंतर्गत येणा-या वरील 6 गावासाठी 50% रक्‍कम नाबार्ड देत असून 50% रक्‍कम पशुपालकांना द्यावयाची आहे. शिवाय  संस्‍थेच्‍या लिंग निश्चित विर्य कांडया (Sex Sorted Semen) वापरल्‍यास मादी वासरे जन्‍माला येणार असून पशुपालक मोठ्या प्रमाणात दुध उत्‍पादन करु शकेल. 
लिंग निश्चित विर्य कांडया (Sex Sorted Semen) वापरुन केलेल्‍या कृत्रीम रेतनातून नुकतेच थोडसरवाडी येथील कुमार लोमटे व संजय दंडनाईक व इतर शेतक-यांच्‍या गायींनी व हिंगजवाडी येथील शेतकरी रविंद्र मुळे यांच्‍या म्‍हशीने मादी वासरांना जन्‍म दिला आहे. उच्‍च प्रतीच्‍या लिंग निश्चित विर्य कांडया (Sex Sorted Semen) वापरल्‍याने या वासरांची दुध देण्‍याची क्षमता जास्‍त असणार आहे. जास्‍त दुध उत्‍पादन झाल्‍याने पशुपालकांना जास्‍त रक्‍कम मिळणार आहे तसेच या वासरांपासून पुढे जन्‍माला येणा-या वासरांची दुध देण्‍याची क्षमताही अधिक असल्‍याने पशुपालकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.  त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा असे अवाहन श्री अतुल मुळे (क्षेत्रीय प्रकल्‍प अधिकरी बायफ, उस्‍मानाबाद) यांनी केले आहे.
 
Top