तुळजापूर / प्रतिनिधी-
शेतकऱ्यांचा द्राक्ष व  दाळींब फळबागांचा विमा पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी,  जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सन 2018-19 कालावधीत प्रथमता पाऊस पडला नाही नंतर फळबागांन वर करपा पडला त्यानंतर कोरोनाच्या कार्यकाळात आलेल्या फळे  जागेवर  खराब झाले यात शेतकऱ्यांचे प्रचंड अर्थिक नुकसान झाले या पिकांचा  शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता त्याचे अद्याप  पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या खात्यावर पिकांचे रक्कम जमा कराव्यात अन्यथा  स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या तर्फ तीव्र आंदोलन करण्याचा इशाराच निवेदनाद्वरे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनाजी पेंदे,  नेताजी जमदाडे, गुरुनाथ भोजणे दिपक झांबरे, पांडुरंग शेलार, रमेश भिंगारे आदींनी दिला आहे.
 
Top