उस्मानाबाद / प्रतिनिधी-
स्वातंत्र्यपूर्व काळापासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले, गवळी गल्लीतील, श्री बाल हनुमान गणेश मंडळ “ धाराशिव चा महाराजा - मानाचा गणपती” यांची प्रतिष्ठापना अत्यंत आनंदीमय व प्रसन्नतेच्या वातावरणात संपन्न झाली.
श्री ची मूर्ती प्रतिष्ठापनेची मोटार सायकलवर सांजा रोड ते गवळी गल्ली रस्त्यावरून आल्यानंतर. गल्लीमध्ये महिलांनी गणपती बाप्पाचेपंचा आरतीने स्वागत करण्यात आले.  फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून, गणपती बाप्पा मोरया, आला रे आला, गणपती आला- कोरोनाला हरवू या, अशा घोषणाने व जय जय काराने गल्ली दुमदुमली होती. गेली 55 वर्ष श्री च्या प्रतिष्ठापने वेळेस भव्य व दिव्य लेझीम पथकासह ढोल ताशा हलगी बुलबुल इत्यादी वाद्यासहित150 मुलांचा- मुलींचा सहभाग असलेला, पांढरा गणवेश व डोईवर भगव्या रंगाच्या टोप्या अशा आकर्षक खेळातून श्री ची प्रतिष्ठापनाची मिरवणूक संपन्न होत होती.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे आवाहन व प्रशासनाने केलेल्या  नियमानुसार साधेपणाने गणपतीबाप्पा मोरया - कोरोनाला  पळवू या. या जय जय कारा श्री ची मूर्ती मनमत पाळणे ,अनिल जावळे, विष्णुदास सारडा, बाळू मेत्रे ,कुंदन दहीहंडे इत्यादींनी आपल्या डोक्यावर घेऊन सन्मानाने मंडळाच्या रंगमंचकावर चौरंगावर  आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पुरोहित, पुजारी श्री सचिन महाराज मंत्र उच्चार, शास्त्रोक्त पद्धतीने, विधिवत पूजेने विश्वेश्वर चपने यांच्या शुभहस्ते  पन्नास वर्षापासून मान ही परंपरा जतन करत  पूजा व आरती काशिनाथ दिवटे, सचिन महाराज यांच्या अत्यंत सुरेख  व भारदस्त आवाजात विविध आरती समूह टाळ्या व टाळ त्यांच्या आवाजाने भक्तिमय व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण केले.
 
Top