उमरगा/ प्रतिनिधी-
 भारतीय बौद्धांच्याच नव्हें तर जगातील बौद्ध अनुयायानां डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला धर्म ग्रंथ दिशादर्शक आहे. बौद्ध धम्मातील विपुल ग्रंथसंपदें मुळे नेमक्या कोणत्या ग्रंथाचा आधार घ्यावा हा बौद्ध जगतासमोर उभ्या असलेल्या प्रश्नाला भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाने नवंसंजीवनी प्राप्त झाली आहे.हा ग्रंथ भीक्षु,उपासक,आणि शासन कर्त्यांना मार्गदर्शक असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  त्रिपीठकाचा अभ्यास करून याची निर्मिती केली असल्याचे मत त्रिरत्न बौद्ध महासंघाचे उपाध्याय धम्मचारी यशोसागर  पुणे यांनी केले.
त्रिरत्न बौद्ध महासंघ लातूर उस्मानाबाद यांच्या वतीने वर्षावास कालावधीत आयोजित केलेल्या दूरचित्रवाणी वरील प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प रविवारी दि २४ रोजी गुंफण्यात आले या वेळी ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म बौद्धांना पथदर्शक आहे या विषयावर बोलत होते.या प्रसंगी अनेक जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी याचा लाभ घेतला.प्रारंभी धम्मचारी विरतकुमार यांनी पाली पूजा घेतली.
आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून त्यानीं डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मातील विशाल वाङ्मयीन ग्रंथाचा सार या ग्रंथात समाविष्ट केला असल्याचे नमूद केले आहे.त्यात सुत्त पिठक, विनय पिठक, अभिधम्म पिठक,प्रज्ञापारमिता सूत्र,मिलींद प्रश्न, अश्वघोष  रचित भगवान बुद्ध चरित्र, आचार्य वसुदेव, आचार्य शांती देव, आदींच्या महायान,हीनयान, वज्रयान या सर्व ग्रंथाचा सार म्हणून यांची निर्मिती केली आहे असे ते म्हणाले.इतर धर्मातील अनुयानां त्या त्या धर्मानुसार आचरण करण्यासाठी धर्म ग्रंथ होते.तसाच बायबल प्रमाणे एक बौद्धांचा ग्रंथ असावा,भिक्षु संघाच्या घटनेत इष्ट फेरबदल करावेत,आणि अखिल जागतिक बौद्ध संघ निर्माण करावा असा १९५० साली महा बोधी सोसायटीच्या पत्रिकेत त्यानीं एक लेख लिहून प्रसिद्धी केला होता त्यांच्या हयातीत त्यानीं हा ग्रंथ निर्माण केला आहे.या ग्रंथात ४० भाग, १४ उपविभाग,२४८ प्रकरणे,व पाच हजार १३ पदे आहेत.सिद्धार्थ गौतमाचा जन्म,त्याचें बालपण, विवाह,गृहत्याग, कठोर तपश्चर्या, दिव्य ज्ञान प्राप्ती, चार आर्य सत्य, आर्य आष्टागीक मार्ग, पवित्राचा मार्ग,सदाचरणाचा मार्ग, पारमितेचे आचरण,भिक्षु संघाची स्थापन, भुक्षु साठी विनय,उपसकाना विनय,धम्म अधम्म सधम्म, बौद्ध जीवन मार्ग,कर्म पूर्णभव, कारण परिणाम, आत्म्याला नाकारून विज्ञानवादी पूर्णभवाचा सिद्धांत,कर्माचा दैववादी दृष्टीकोना ऐवजी वास्तविक वर्तमान आचरण या वर भर दिला असल्याचे नमूद केले.बौद्ध उपासकांनी या ग्रंथाचे केवळ पठणच नाही तर त्याचे आचरण करून आपले जीवनात आपेक्षीत बदल घडवून आणावेत असे आवाहन त्यानीं केले.कार्यक्रमास धम्मचारी अनोमदस्सी,ज्ञानपालीत,कल्याणदस्सी,अनोमकीर्ती,वरोदय,कुशलरत्न, आदी धम्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन धम्मचारी रत्नपालित यांनी केले 
 
Top