लोहारा/प्रतिनिधी
लोहारा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र 6,7,8,17 मध्ये स्थानिक नगरसेवक, नगरसेविका यांच्या प्रयत्नातुन दि.11 ऑगस्ट 2020 रोजी प्रभाग अंर्तगत सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले. दलितोतर विकास निधी मधून अंदाजे 6 कोटी 63 लाख रुपये च्या विविध विकास कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, गटनेते अभिमान खराडे. नगरसेवक अबुलवफा कादरी, नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक बाळासाहेब कोरे, नगरसेवक गगन माळवदकर, माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे, डाँ.चंद्रशेखर हंगरगे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी पं.स.सुधीर घोडक, महेश अप्पा वाले, बसाया स्वामी सर, मल्लिकार्जुन पाटील, मल्लीनाथ घोंगडे, गणेश कमलापुरे, आयुब शेख, नितीन वाघ, काका घोडके, दत्ता वाघ, सुकाजी सातपुते दिनेश माळी, राजु घोडके, गणेश कमलापुरे, माणिक कदम, शांतीविरअप्पा जट्टे, हणमंत गरड, गणेश खबोले, अप्पा पांढरे, चिदानंद जट्टे, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्यामुळे शहरातील प्रभागातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top