कोविड - १९ संसर्गाला प्रतिबंध व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. त्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खालील व्यक्तींविरुध्द पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
यामध्ये गोपाळ राठोड (रा. कदेर) यास दि.४ रोजी सायंकाळी उमरगा येथील साईबाबा हॉस्पिटलसमोरील हॉटेलमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळला. रामचंद्र दगडूलाल बांगड (उस्मानाबाद) दि.४ ऑगस्ट रोजी समर्थनगर परिसरात बांगड किराणा या दुकानात ४३,३५४ रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगला असताना असतांना आनंदनगर पोलिसांनी कारवाई केली.