ऐन कोरोना संसर्गाच्या काळात प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या प्रशासकीय बदल्यांची टांगती तलवार दूर झाली फक्त विनंतीच बदल्या कराव्यातअसे आज राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हापरिषदेला कळवले आहे.या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केले आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या प्रशासकीय बदल्यांची टांगती तलवार दूर झाली आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश बजावले आहेत. तसेच, गैरसोयीच्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांसाठी ‘जिल्हांतर्गत विनंती बदल्या’ समुपदेशन पद्धतीने करण्यासही हिरवा कंदील दाखविला आहे. धास्तावलेला गुरूजींसाठी ही गुड न्यूज ठरणार असून, या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने स्वागत करुन समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाचा ऐन संसर्ग भरात आलेला असताना ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याची तयारी केली होती. बदलीपात्र अशा पंधरा टक्के शिक्षकांची माहिती जमा करून १० ऑगस्टला ऑफलाईन बदल्यांची प्रक्रिया पार पडणार होती. ऑफलाईन पध्दतीवर तर टीका झालीच, पण कोरोनाच्या काळात बदल्यांची प्रक्रिया कशी करायची, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनांना पडला होता. शिवाय बदल्या झाल्यावर संसार पाठीवर घेऊन स्थलांतर करणे ही अशक्यच होते
या बाबत खा.शरदचंद्रजी पवार यांच्या सुचनेवरुन ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी दि.१८ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिका-या समवेत कोल्हापूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या शैक्षणिक वर्षात प्रशासकीय बदल्या रद्द करुन फक्त विनंती बदल्या करण्याचा निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती या वेळी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात ,प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव ,बाळासाहेब मारणे अध्यक्ष पुणे हे उपस्थित होते .
तसेच गेल्या दोन दिवसापासुन जामखेडचे आ.रोहित दादा पवार यांनी ही ना.मुश्रीफ यांचे कडे पाठपुरावा करत होते .या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक समाधान व्यक्त करत असून यात गेल्या दोन वर्षात गैरसोईने बदली झालेल्या शिक्षकांचा विनंती बदलीत समावेश करावा अशी मागणी होत आहे .