उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तीन वर्षांपूर्वी बळजबरीने हिसकावून नेलेल्या मोबाइलसह एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर सेलच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीचा तपास लावला.
चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध सायबर सेलमार्फत निरंतर घेतला जातो. २०१७ ला कळंब तालुक्यातील एकाने मोबाईल फोन हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मोबाईलचा शोध सुरू होता. यामध्ये सायबर सेलकडून मोबाईल वापरात आहे का, याचा शोध घेण्यात येत होता. मोबाईल फोन वापरात असल्याचे सायबर सेलच्या निदर्शनास आले. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दयानंद संदीपान साबळे (४१, वर्षे, रा. अंदोरा, ता. कळंब) यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त केला आहे. ही कारवाई सायबर सेलचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन पंडीत, स्थानिक गुन्हे शाखेचे आशिष खांडेकर यांनी केली.