वाशी/ प्रतिनीधी 
छत्रपती शिवाजी विद्यालय ,वाशीया विद्यालयाने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. प्रसाद काकासाहेब गवारे इ.५वी याने २५४ गुण घेऊन राज्यात २४ वा, जिल्ह्यात ७ वा  तर केंद्रात प्रथम क्रमांक भूषविला आहे. वैष्णवी परमेश्वर तुंदारे हिने २१८ गुण घेऊन राज्यात ३२ व जिल्ह्यात ९ वा तर केंद्रात द्वितीय क्रमांक भूषविला आहे. श्लोक शिवशंकर राऊत इ ७ वी याने २६४ घेऊन राज्यात ९ वा जिल्ह्यात व केंद्रात प्रथम क्रमांक भूषविला आहे.
 श्रेया बापूसाहेब सावंत इ. ७ वी हिने २२२ गुण घेऊन राज्यात ३० वा  जिल्ह्यात ५ वा तर केंद्रात द्वितीय क्रमांक भूषविला आहे. राजनंदिनी अमोल भोसले इ ७ वी हिने १९८ गुण घेऊन राज्यात ४२ वा जिल्ह्यात त१३ वा तर केंद्रात तृतीय क्रमांक भूषविला आहे. बापूसाहेब सावंत , उमेश कवडे , अनिल डोके , श्रीधर धारकर , बी. डी. कांबळे , एस. व्ही. क्षीरसागर , एस.बी. छबिले , श्रीमती जे. के. ठाकर , श्रीमती पी. एच. माने यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक दत्तात्रय कोकाटे , पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, महामुनी , पालक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी यांनी अभिनंदन केले .
 
Top