तुळजापूर / प्रतिनिधी-
विघ्नहर्ता श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंद दादा कंदले मित्र मंडळच्या वतीने तुळजापूर शहरातील क्वारटांईन सेंन्टर मध्ये असणाऱ्या कोरंटाईन  मंडळींना  श्रीगणेशोत्सवात दहा दिवस दररोज गोड पदार्थांची मेजवानी  देऊन हा उत्सव  साजरा होणार आहे.  या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमंत राजयोगी पावणा-या गणपतीला मोतीचुर लाडू प्रसाद तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते दाखवून हा गोड पदार्थ क्वारटांईन मंडळीना वाटुन करण्यात आला.
 शनिवार २२ ऑगस्ट रोजी  तुळजापूर मधील श्री सुवर्णेश्वर गणपतीला प्रसाद दाखून  शहरातील 108 भक्त निवास, 124 भक्त निवास व ग्रामीण रुग्णालय येथील 300 नागरिकांना बुंदीचे लाडू वाटण्यात आले.  यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, डॉ. होनमाने, आनंद कंदले,रत्नदीप भोसले, रणजित पाटील, राम जाधव, मिथुन पोफळे, अनिल पवार,  दादा भोरे, सुरज गायकवाड, कुणाला रोंगे, सुलेमान शेख, ओंकार इगवे,व आनंद दादा कंदले मित्र मंडळ सहकारी उपस्थिती होते.
 
Top