उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
शासकीय विश्रामगृह, शिंगोली (उस्मानाबाद) येथे जिल्ह्यात डाक विभागामार्फत विविध योजना संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. बैठकीत डाक विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या ५ वर्षीय डाकघर आवर्ती जमा खाते (आर.डी.), डाकघर सावधी जमा खाते (टी.डी.), डाकघर मासिक आय योजना खाते (एम.आई.एस.), वरिष्ठ नागरिक बचत योजना (एस.सी.एस.एस.), १५ वर्षीय सार्वजनिक भविष्य निधि खाते (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र (एन.एस.सी), किसान विकास पत्र (के.वी.पी.), सुकन्या समृध्दी योजना विविध योजनांचा आढावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी घेतला.
ग्रामिण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर, निरक्षर नागरिकांचे पैसे पोस्ट ऑफिस मध्ये आहेत. यामध्ये बोर्डा, निपाणी, वाशी या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वच पोस्ट ऑफिसचे ठिकाणची इन्स्पेक्टर मार्फत पाहणी करून अहवाल देण्यात यावा. संबंधित खातेदारांच्या तक्रारीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये दर्शनी भागावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्र लावावेत. व्यवहाराची पावती देवून तात्काळ ऑनलाइन नोंद घेण्यात याव्यात. यामुळे गैरव्यवहार कमी होतील व पोस्टाच्या व्यवहारात पारदर्शकता येईल. पोस्ट ऑफिसची गैरव्यवहार मुळे जी प्रतिमा मालिन होत चालली आहे. ती अबाधित ठेवावी. डाकघरामध्ये जनजागृती करणारे फलक लावण्यात यावेत त्याचप्रमाणे डाकविभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या हिताच्या योजनांची प्रसिध्दी करण्यात यावी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
बैठकीस डाकघर अधिक्षक उस्मानाबाद डाक विभाग , मुख्यालय लातूर बी.रवि कुमार, सहायक अधिक्षक , डाकघर उस्मानाबाद उपविभाग श्री एस.एस.रणखांब , सहायक अधिक्षक उस्मानाबाद विभाग श्री.एस.पी.कोळपाक, डाक निरिक्षक भूम उपविभाग श्री.एस.जे.माने, डाक निरिक्षक उमरगा श्री.आर.जी. जेठे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.