उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू, भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, तालुका क्रीडा अधिकारी, सुवर्णकन्या कु. सारिका काळे यांना क्रीडा क्षेत्रातील भारतातील मानाचा सर्वोच्च अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांनी घरी जाऊन सत्कार पालकांसमवेत सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, पं. स.सदस्य गजेंद्र जाधव, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रविण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, प्रशिक्षक अल्लाउद्दीन सय्यद, कैलास लांडगे, अभिजित देशमुख आदी उपस्थित होते.

 
Top