उस्मानाबाद / प्रतिनिधी-
येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा पुर्व नगरसेवक सुरेश शेरखाने यांचे शुक्रवारी रात्री सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
परोपकारी वृत्ती, सेवाभाव यामुळे ते लोकप्रिय होते. उस्मानाबाद जिल्हा चर्मकार महासंघाचे ते आधारवड तर काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुले असा परिवार आहे. येथील हार्डवेअरचे व्यापारी पद्माकर शेरखाने व सेनेचे नितीन शेरखाने यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

 
Top