उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासना वरील ताण पाहता त्यांना मदत करण्यासाठी  उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाज धावून आला मागील काही दिवसात कोरोना रोगाची व्याप्ती पाहता भयाचे वातावरण होते  गरीब गरजू लोकांना शासकीय यंत्रणेकडून व्यवस्थित वैद्यकीय सुविधा  मिळत नव्हती  यामुळे  सामान्यांच्या मनात  असंतोष निर्माण झाला होता. यामुळे मा. जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या संकल्पेतून गरजू लोकांची मदत करण्यासाठी  उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मोहल्ला क्लिनिक ची संकल्पना राबविण्यात आली सुरुवातीला 5 मोहल्ला क्लिनिकची सुरुवात झाली  लोकांची गरज पाहता मोहल्ला क्लिनिक ची संख्या वाढत 8 पर्यंत गेली  खिरणी मळा, रसूल पुरा या मोठ्या प्रमाणात रहिवाशी संख्या असलेल्या भागात 8 व्या मोहल्ला क्लिनिक चे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार एबीपी माझा चे ब्युरो चीफ राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद नगराध्यक्ष  मकरंद राजे निंबाळकर यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून डिवायएसपी मोतीचंद राठोड, तहसीलदार गणेश माळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दगु भाई शेख, नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांची उपस्थिती होती यावेळी उद्धाघाटक राहुल कुलकर्णी यांनी सदर संकल्पनेची स्तुती करीत कोरोना ची व्याप्ती पाहता संपूर्ण  महाराष्ट्रात गरजू रुग्णांना वैद्यकीय  मदत मिळावी यासाठी मोहल्ला कलीनिकचा अभिनव प्रयोग फक्त उस्मानाबाद शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने राबविण्यात येत आहे. याविषयी अभिमान व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसूद शेख यांनी केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण, नगरसेवक खलीफा कुरेशी, बाबा मुजावर, इस्माईल शेख, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे, इलियास पिरजादे, अतीक शेख, एजाज काझी, वाजीद पठाण, खलिल पठाण, मन्नान काझी, मुझ्झमिल काझी, अलीम पेंटर सहाब, इम्तियाज बागवान, इस्माईल काझी व सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्तीथी होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज शेख यांनी केले तर  उपस्थितांचे आभार  मैनुद्दीन पठाण यांनी मानले.

 
Top