उस्मानाबाद / प्रतिनिधी-
डिक्की (DICCI)च्या पश्चिम विभागाची पहिली प्रादेशिक वेबिनार बैठक शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते डिक्की (DICCI) पश्चिम भारत विभागाच्या अध्यक्षपदी अविनाश जगताप यांची व समन्वयक पदी संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी दिली आहे.
पंतप्रधानांच्या स्वप्नातील ‘आत्मनिर्भर भारत’ निर्मितीच्या प्रयत्नात डिक्की (DICCI) आगामी काळात अग्रेसर राहून प्रयत्न करेल. जिल्हा स्तरावर उद्योजक निर्माण करून डिक्की (DICCI) त्यांना आत्मनिर्भर करेल. त्यासाठी डिक्की (DICCI)च्या देशभरातील पदाधिकाऱ्यांनी त्या दिशेने काम करावे, असे आवाहन डिक्की (DICCI)चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी यावेळी केले.
नवीन अध्यक्ष आणि समन्वयक यांनी सर्वांना  सोबत घेऊन डिक्की (DICCI)च्या माध्यमातून आपण डॉ. बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक विचार  तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवू. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी  प्रयत्न करू. असे  सांगितले.
या बैठकिला डीक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, कार्याध्यक्ष रविकुमार नारा, महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज आदमाने, मराठवाडा अध्यक्ष प्रफुल्ल पंडित व पश्चिम भारत विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारची माहिती  उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शीतलकुमार शिंदे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 
Top