उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून दिनांक 19 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान उस्मानाबाद - धाराशिव या फेसबुक पेजच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत वाईल्ड लाईफ अॅक्शन प्रकारात प्रा.मनोज डोलारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे प्रा.डोलारे हे पक्षी अभ्यासक असून श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात ते अध्यापनाचे काम करतात. त्यांनी हातलादेवी परिसरातील सुगरण पक्षाचे छायाचित्र स्पर्धेत सादर केले होते. संसारासाठी घरटे बांधताना होणारी लगबग, भांडणे, वर्चस्वासाठीची लढाई हा सगळा प्रपंच त्यांनी या छायाचित्रातून मांडला.
उस्मानाबाद जिल्हा तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून 360 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. वाईल्ड लाईफ अॅक्शन आणि लॅन्डस्केप या दोन विभागात आयोजित या स्पर्धेत वाईल्ड लाईफ प्रकारात निलेश टेपाळे हे द्वितीय तर रुपाली शेटे ह्या तृतीय आल्या आहेत. लॅन्डस्केप प्रकारात बाजी मारत अभिजीत माळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी गडदेवदरी येथील पुलावरुन जाणा-या रेल्वेचे विहंगम छायाचित्र सादर केले होते. लॅन्डस्केप प्रकारात श्रीशैल जत्ते हे द्वितीय तर साक्षी गोस्वामी ह्या तृतीय आल्या आहेत.
विजेत्यांचे आणि स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे उस्मानाबाद - धाराशिव पेजच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मनोज घायाळ यांनी अथक परिश्रम घेतले.