परंडा /प्रतिनिधी :- शहारा लगत च्या शेतात शहरातील मोकाट जनावरे घुसून पिंकांची नासधूस वारंवार करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी परंडा तहसिलदार व मुख्याधिकारी यांना गुरुवार ( दि. २० ) दिलेल्या निवेदनात केली आहे.
परंडा नगर परिषदेकडे कोंडावडाच नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे .शेत पीकांची नासाडी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मोकाट जनावरं करीत आहेत.तसेच बाजारपेठ, रोड, चौक, बसस्थानक आदि ठिकाणी यांचा वावर असल्याने नागरिकांना तसेच व्यापारी, भाजी,फळे विक्रते यांना त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांना रात्रंदिवस राखण करावी लागत आहे.मोकाट जनावरे शेतकऱ्यांनी पकडून बांधून ठेवली तर हे लोक दमदाटी करून सोडवून नेतात.तरी संबंधीतांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त  करावा अन्यथा उपोषण करण्यात येईल.असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर महादेव मेहेर, रईस मुजावर, जाकीर मुजावर, इरफान मुजावर, मुस्ताक पल्ला, पांडू खताळ,नुरू६ीन मुजावर, निजाम मुजावर, ज्ञानेश्र्वर खताळ आदि शेतकऱ्यांची निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

 
Top