उस्मानाबाद /  प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील मुस्लिम नागरिकांच्या पुढाकारातुन ख्वॉजानगर परिसरात चार तसेच गालिबनगर, मिल्ली कॉलणी व शिरिण कॉलणी भागात प्रत्येकी एक असे एकूण सात मोहल्ला क्लिनिक टप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनीही यासंकल्पनेला पाठबळ दिले आहे. आतापर्यंत या सात क्लिनिकमध्ये सुमारे साडेचार हजारांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. सामन्य ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा अाजारांसोबत उच्च रक्तदाब, रक्तशर्करा वाढणे किंवा कमी होणे आदी आजारावर उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अधिक त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे.
दि. 19 ऑगस्ट  रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व बेंबळी येथील दक्षता समितीच्या वतीने मोहल्ला क्लिनिकला भेट देण्यात आली.यावेळी येथील डॉक्टरांकडून करण्यात येत असलेल्या उपचारासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर या क्लिनीक मध्ये सेवा देणारे  उपजिल्हा अध्यक्ष डॉ. सायम रझवी सर  व माजी मानव मिशन जिल्हाध्यक्ष डाॅ. मिन्हाज शेख  या दोन्ही डॉक्टरांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी  सतिश शिवाजी लोंढे,  महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी नंदकुमार चनबसय्या मानाळे, तालुकाध्यक्ष श्यामसुंदर कमलाकर पाटील, कामगार मंडळ तालुकाध्यक्ष सय्यद समद भाई , शहराध्यक्ष अब्दुल वहीद शाहनुर सय्यद तसेच दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते. 
 
Top