उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तक्रारीनुसार चोरीचे मोबाइल वापरत असल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याप्रमाणे सायबर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेने फोन वापरकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यातून ते १० स्मार्टफोन जप्त करत सोमवारी (दि.२४) मुळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.
पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन व अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या हस्ते हे १० स्मार्टफोन मुळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दगूभाई शेख, सायबर पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडीत यांच्यासह मोबाईल फोनचे मुळ मालक अशिफ शेख, रितेश कांबळे, अंगद सुतार, रुपेश घरबुडवे, शन्नो शेख, शुभम कोळगे, लक्ष्मण तिंडे, अमोल कुलकर्णी हे उपस्थित होते. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडीत, एलसीबीचे पोहेकॉ किशोर रोकडे, पोना- दीपक लाव्हरे- पाटील, पोकॉ- पांडुरंग सावंत आदींनी पुढाकार घेतला.