उस्मानाबाद/प्रतिनिधी - 
अनुसुचित जाती व नवबौध्द वस्त्यांचा विकास करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपल्बध करून दिला जातो. २०२०-२१ मध्ये २९ कोटी मंजूर झाले असून २८ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या कामांना मान्यता दिली. मात्र सदरील निधी वाटपात उमरगा-लोहारा या दोन तालुक्याला अनियमियता असून भरीव निधी न दिल्याची तक्रार सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांनी केली आहे.
जि.प. विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी असे नमूद केले आहे की, जि.प. सदस्यांना पत्र देण्याबाबत मागणी करुन दिलेल्या पत्रानुसार निधी न देता व विश्वासात न घेता निधी वाटप करतात, असा आरोप करुन पुढे ते म्हणाले की, पत्राच्या मागणीनुसार निधी न देता इतर कामांना प्राधान्य दिले जाते आहे. मतदार संघातील तसेच उमरगा तालुक्यातील सदस्यांनी ही बाब माझ्याकडे निर्दशनास आणून दिली की, निधी वाटपात उमरगा-लोहारा तालुक्याला भरीव निधी देण्यात आलेला नाही. तर सत्ताधाऱ्यांनी मागणी नुसार विकास निधी न देता मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे विकास कामाच्या ठिकाणी मतभेद व राजकारण बाजूला ठेवून सर्व सदस्यांनी एकत्र यावे असे आवाहनही पाटील यांनी केले.
 
Top