कळंब ( शिवप्रसाद बियाणी )
उस्मानाबाद जिल्हा करीता ऑक्सीजन लिक्विड टॅंक व फिजिशियन भूल तज्ञ देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना शिवसेना राज्यसंघटक गोविंद घोळवे यांनी दिले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाते वेळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे चार हजार रुग्ण आहेत. यातील २५०० रुग्ण ठिक झाले असुन उर्वरित १५०० रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर १२० च्या आसपास रुण्नांचा मृत्यू झाला आहे. पुढील काळात कोरोनाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज आरोग्य विभागाचा आहे. याला गांभीर्याने घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आणखीन विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
 या करीता त्वरीत सुमारे ९० लाख रुपये किंमतीचे दोन अॉक्सिजन लिक्विड टॅक, दहा फिजिशियन भुलतज्ञ, आणि १५ सिस्टर अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यक आहे. डॉक्टर व सिस्टर संदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने याना लिहुन लातुर येथील मेडिकल कॉलेज मधील शिकाऊ डॉक्टर उपलब्ध करून देण्या बाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, यांच्याकडे सुध्दा मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील यांनी कोरोना काळात चांगले काम केले असुन यांनी सुध्दा उस्मानाबाद जिल्ह्यातील रुण्नांचा विचार करुन शासकीय दवाखान्यात आणखीन काही उपकरणे वाढवण्याची मागणी केली आहे. असे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांची स्वाक्षरी आहे.

 
Top