उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आवश्यक व परिपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सचिव सौरभ विजय यांना दिले आहेत.
उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीबाबत चर्चा व्हावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या आदेशानुसार व पर्यटक, पर्यावरण, राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बुधवारी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः आदित्य ठाकरे, खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील व संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली असुन शासन त्यासाठी सकारात्मक असल्याची भुमिका वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी मांडल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालकांनी जिल्हाधिकारी यांना वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीनीची उपलब्धतेबाबत विचारणा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनीही २५ एकर जमीन उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय विभागाला कळविण्यात आले आहे. या शिवाय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या इतरही आवश्यक अटीची पुर्तता देखील झाली असुन कुठेही अडचण येऊ नये असा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. तो प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मंत्री देशमुख यांनी सचिवांना दिले. त्यामुळे जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सूरु होण्याच्या प्रक्रियेला या बैठकीनंतर निश्चितपणाने वेग येईल असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.