उस्मानाबाद दि.३० (प्रतिनिधी) - जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आज दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत २०७ झाली असून चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूंची लागण झाली आहे की नाही ? हे तपासण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसर उस्मानाबाद येथील तपासणी प्रयोगशाळेत ३११ जणांचे स्वॅब आरटीपीसीआर तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २९७ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील एकशे चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच १७६ नमुने निगेटिव्ह व १७ अहवाल संदिग्ध तर त्यापैकीच १४ अहवाल प्रलंबित आहेत. तसेच रॅपिड अॅन्टीजन तपासणीद्वारे ६९७ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १०१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह व ५९६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आज आलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्टची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- आरटीपीसीआर तपासणीमध्ये उस्मानाबाद -१४, तुळजापूर - २३, उमरगा - २१, कळंब - २२, परंडा - ८, लोहारा - ५, भूम - १० व वाशी - १ असे एकूण - १०४ तर अॅन्टीजन तपासणीत उस्मानाबाद - ४२, तुळजापूर - १२, उमरगा - ९, कळंब - १४, परंडा - २, लोहारा - ११, भूम - ८ व वाशी - ३ असे एकूण १०१ व जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र बाहेर जिल्ह्यात असलेल्या दोघाजणांना बाधा झाली आहे. तर आज बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या २५१ असून आजपर्यंत ३५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४.१७ टक्के आहे. तसेच ३६ हजार ४३ स्वॅबची तपासणी केली असून त्यापैकी ५ हजार ५३५ नमुने पॉझिटीव्ह आले असून हे प्रमाण १५.३६ टक्के आहे. तर ७ हजार १३० व्यक्ती होम क्वॉरन्टाईनमध्ये व ९१८ जण व्यक्ती संस्थात्मक क्वॉरन्टाईनमध्ये आहेत. तर आजपर्यंत जिल्ह्यातील १४२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
