उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शहरातील साळुंके नगर येथील सैफुद्दीन गुलाम सय्यद (३८) यास दुचाकीला खुलेआम तलवार अडकवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सैफुद्दीन सय्यद हा दि. ५ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील पवनराजे निंबाळकर कॉम्प्लेक्स समोरील रस्त्याने दुचाकीवरून (क्र. एमएच २५ एक्यु ३५५१) हॅन्डलला तलवार लटकवून दहशत निर्माण करून फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला.