उस्मानाबाद /प्रतिनिधी-
लाेहारा तालुक्यातील जेवळी येथील लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये चार्जिंगसाठी लावलेला उमाकांत पनुरे यांचा ७२ हजाराचा मोबाइल दि.७ जुलै रोजी रात्री चोरीला गेला होता. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात मोबाईल व रोख ९०० रुपये चोरीला गेल्याची तक्रारही दाखल झाली होती. 
या तक्रारीबाबत सायबर पोलिस ठाण्याच्या मार्फत शोध घेण्यात आला होता. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.४ ऑगस्ट रोजी आरोपी संतोष ज्ञानोबा पवार (रा. तुंगी, ता. औसा) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदरचा मोबाइल जप्त केला. तसेच उर्वरित कार्यवाहीस्तव त्यास लोहारा पोलिसांच्या ताब्यात दिले.

 
Top