उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील केशेगांव-आंबेवाडी रस्त्यावर असणाऱ्या "मयुर ढाबा ' येथे बेंबळी पोलिसांनी कारवाई करत देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ४ हजार १४६  रुपये आहे.  ही कारवाई बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख नेतृत्वाखालील पथकाने दि. १ ऑगस्ट रोजी केली आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात प्राप्त झालेली माहिती अशी की,  तालुक्यातील केशेगांव परिसरात बेंबळी पोलिसांना अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बेंबळी पोलिसांनी केशेगांव-आंबेवाडी रस्त्यावरील मयुर ढाबा येथे सापळा रचला. यावेळी सचिन महादेव कोळगे  हा (रा.केशेगांव ता. उस्मानाबाद ) मद्य विक्री करण्याच्या उद्देशाने देशी-विदेशी दारूच्या ५९ बाटल्या बाळगून असल्याचे निदर्शनास आला. त्याची किंमत अंदाजे ४ हजार १४६ रूपये आहे. या दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 ढाब्यामध्ये अवैध दारू विक्री सुरू
बेंबळी परिसरात अनेक ढाबे आहेत. यातील अनेक ढाब्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. याकडे ही बेंबळी पोलिसांनी लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 
 
Top