तुळजापूर / प्रतिनिधी-
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी पब्लिक  चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन अॅड. अनिल काळे यांच्या हस्ते तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे रविवार  दि. 02 ऑगस्ट रोजी  सकाळी 9 वा. होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दरम्यान  कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर ग्रामस्थांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी व लोकांना कोरोना होऊ नये या हेतूने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचित केलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करत असल्याचे संस्थेचे चेअरमन ऍड.अनिल काळे यांनी सांगितले,तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या गोळ्या प्रत्येक घरी जाऊन त्यांना समजावून सांगून द्याव्यात असेही सांगितले.
यावेळी केमवाडी गावातील पप्पु नकाते, सोमनाथ सातपुते, राजेंद्र डोलारे, शिवाजी सातपुते,प्रकाश जतकर,बालाजी काळे,मनोज काशीद,श्रीकांत धावणे,हरी काळे,दत्ता ताटे,बजरंग कदम,शाहू कदम,राम इतुकडे,शिवाजी सातपुते,उमाजी काळे ,तात्या पाटील,लक्ष्मन जाधव,राहूल गायकवाड, नवनाथ डोलारे , निलेश काशिद, बालाजी माळी,आण्णा कारंडे, विलास काळे,तात्या जाधव,आदम पठाण, पैगंबर पठाण  व सर्व आशाताई व इतर नागरिक उपस्थित होते.
 
Top