उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील देवळाली, देवधानोरा, मंगरुळ, कोठाळवाडी, सात्रा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गावास खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी गावातील लोकप्रतिनिधी, नागरिकांशी चर्चा केली. आशा कामगार यांना प्लस ऑक्समिटर, तापमान मोजण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचा योग्य वापर कसा करायचा व सोबतच आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यास सुपूर्द करण्यात आल्या. नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन खासदार व आमदार साहेबांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, विभागप्रमुख बाळासाहेब गंभीरे, पत्रकार अशोक शिंदे, देवळाली चे सरपंच डॉ.मनिषा जगताप, डॉ.रविंद जगताप, सुधाकर महाजन, देवधानोराचे सरपंच लालासाहेब बोंदर, बाळासाहेब काळे, बिभिषण आप्पा गायकवाड, ईश्वर शिंदे, नायब तहसीलदार असलम जमादार, गटविकास अधिकारी श्री. राजगुरू, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाधव, कळंब पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. दराडे, शिराढोन पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.नेटके, वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय चाळक, ग्रामविकास अधिकारी श्री.कदम, तलाठी जांभूळधरे मॅडम, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top