उस्मानाबाद / प्रतिनिधी-
संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दत्तक घेतलेल्या “मुर्टा-मानमोडी” ता. तुळजापूर गावातील समस्या व कृती आढावा संदर्भात बैठक घेण्यात आली.
पायाभूत सुविधा देण्याबरोबरच आदर्श गाव बनवण्यासाठी गावातील प्रामुख्याने समस्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत सिमेंट रस्ते, सुशोभीकरण, शेत रस्ते, गावजोड रस्ते, पाणंद रस्ते, फळबाग लागवड करणे, दारू बंदी, गावात आरोग्य शिबीर राबवणे, महिलांसाठी लघुउद्योग, तांडा वस्ती वरती पाणीपुरवठा करणे, सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ते करणे, अंगणवाडी बांधणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी LED लॅम्प बसवणे, सोलार पंप बसवले, घरकुल योजनेचा आढावा घेतला, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम करणे, नविन ग्रामसचिवालय बांधणे, सिंगल फेस डीपी बसवणे, शाळेत व सार्वजनिक ठिकाणी  कॅमेरे बसवण्यात यावेत, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे अशा विविध समस्येवर चर्चा करून खासदार साहेबांनी कृती आराखडा तयार करण्या संदर्भात सूचना केल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, भाजपा तालुका प्रमुख सत्यवान (भाऊ) सुरवसे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.राऊत, जि.प. कार्यकारी अभियंता सुनिता पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पवार, कृषि अधिकारी श्री. गायकवाड, तलाठी, ग्रामसेवक, Mscb अधिकारी, तसेच आदी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
Top