तुळजापुर/प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  संकटाच्या काळात पक्षाशी एकनिष्ट राहणारे  अमर चोपदार यांची दि.६ गुरुवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष पदी निवड झाली. रा.काँ चे जेष्ट नेते जीवनराव गोरे ,मा.आ.राहुलभैय्या मोटे,जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार,संपतराव डोके,सरचिटणीस नितीन बागल यांच्या हस्ते अमर चोपदार यांना निवडीचे पञ देण्यात आले.
यावेळी प्रतापसिंह पाटील युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,युवक जिल्हाध्यक्ष अदित्यभैय्या गोरे,पदवीधर जिल्हाध्यक्ष दशरथ कोळेकर,धनंजय पाटील,अशोक जाधव,अच्युत वाघमारे,संदिप गंगणे,सचिन कदम,शरद जगदाळे,दुर्गेश साळुंके,बाळु पेंदे,गणेश नन्नवरे,शशी नवले,तौफिक शेख,समर्थ पैलवान,रोहीत चव्हाण उपस्थित होते.रा.काँ.च्या शहर अध्यक्ष पदी अमर चोपदार यांची निवड होताच शहरातील नागरीकांनी चोपदार यांचे जोरदार स्वागत केले.
x

 
Top